logo

आचारसंहितेचा भंग होणार नाही ,याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी, डॉ सचिन ओंबासे ,राजकीय पक्षांसोबत बैठक

धाराशिव - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीची कामे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले.
आज १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्यासह राजकीय पक्षांचे बाळासाहेब सूर्यवंशी, सुनील साळुंखे,जगदीश पाटील,संजय वाघमारे,कलिम पठाण,इंद्रजीत देवकते,प्रतीक माने राजाभाऊ शेरखाने व भारत इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.ओंबासे म्हणाले, निवडणुकीच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्याबाबतची तक्रार सी-व्हिजिल ॲपवर नोंदविता येते.अडतदारला २ लक्ष रुपये, रिटेलरला १ लक्ष रुपये आणि सामान्य नागरिकाला २० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन जाता येते,मात्र या रक्कमेची कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. यावेळी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त ३८४ उमेदवारांना मतदान करण्याची क्षमता आहे.त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे लागते,असे सांगून डॉ.ओंबासे यांनी एक खिडकी योजना व सुविधा पोर्टल याबाबतची माहिती उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले.

यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले

0
0 views